Deception: Pakistan, the U.S. and the Secret Trade in Nuclear Weapons – पुस्तक परीक्षण

ऍड्रीयन लॆव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क या दोन इंग्रज पत्रकारांनी लिहिलेल ही पुस्तक खूप पुराव्यांवर आधारित आहे. ए कयू खान या सर्वांना परिचित आणि भारतात कुप्रसिद्ध पाकिस्तानी शास्त्रज्ञापासून सुरू होणार हे पुस्तक पुढ पाकिस्तानी आण्विक कार्यक्रम कसं बाळस धरत गेला त्याला वेगवेगळ्या काळात वेगवेगळया पाकिस्तानी व्यक्तींनी कस पुढ नेल यांचा धांडोळा ही पुस्तक घेत. मुळात पाकिस्तानी कार्यक्रम सुरू झाला तो भारतान मे १९७४ मध्ये पहिला आण्विक स्फोट केला तेव्हा. झुल्फीकार अली भुट्टो यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञांना एकत्र बोलावून विचारल – तुम्ही मला अणूबॉम्ब देऊ शकता का. त्याला एका तरुण शास्त्रज्ञान – सुलतान बशीरउद्दीन महमुदन – होकारार्थी प्रतिसाद दिला. किती वेळ लागेल असं विचारल असता माहमुदन सांगितल की पाच वर्ष लागतील. त्यावर भुट्टोनि त्याला “मी तूला तीन वर्ष देतो – मला तीन वर्षात बॉम्ब दे” म्हणून सांगितल. इथून सुरू होतो तो पाकिस्तानचा अणुबॉम्ब बनवायचा थरारक प्रवास. पुढ त्यात यश मिळाल्यावर पाकिस्तान कडचा बॉम्ब हा आता केवळ भारतासाठीच नव्हे तर संबंध जगासाठी देखील धोकादायक ठरू शकतो.

२७ एप्रिल १९३६ ला भारतातील भोपाळमध्ये खान माता पित्याच्यापोटी जन्माला आलेल्या या सातव्या अपत्यान – अब्दुल कादीर खान यान संबंध जगासाठी डोकेदुखी निर्माण करून ठेवली. पाकिस्तानात खान यांना पाकिस्तानन त्यांच्या कर्तुत्वाबद्दल निशान-ए-इमतियाज आणि हिलाले इमतियाज असे दोन पुरस्कार दिले आहेत. ४ फेब्रुवारी २००४ रोजी थेट प्रसारित केलेल्या इंग्रजीत केलेल्या भाषणात त्यांनी स्वतः आण्विक शस्त्रा संबंधीच ज्ञान आणि सामग्री विकल्याच मान्य केल. ही कबुली आणि पश्चाताप खरे होते का? तर नाही. लोकनियुक्त सरकार बरखास्त करून सत्ता हस्तगत केलेल्या लष्करी अध्यक्ष परवेज मुशर्रफ (डॉ. खान यांच्या प्रमाणेच हेही मूहाजिरच) आणि खान यांच्यातील स्पर्धेत मुशर्रफन पाकिस्तानचा आण्विक प्रकल्प आणि स्वतःला वाचवायला खान यांचा बळी दिला होता.

स्टीव्ह कोलच्या “घोस्ट वॉर” पुस्तकात नोंद केल्याप्रमाणे १९७९ मध्ये अमेरिकेन अफगाणिस्तानात रशियाच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नुकसान करायसाठी तिथल्या स्थानिक लढवय्याना – मुजाहिदना मदत करायच ठरवल. या कामी अमेरिकेन पाकिस्तानची मदत घेतली. त्यासाठी पाकिस्तानला शस्त्रास्त्रव्यतिरिक्त दहा वर्षात कमीत कमी ११ अब्ज डॉलर आणि सौदीन जवळ जवळ तेवढीच मदत केली. ही मदत प्रामुख्यान अफगाणिस्तानला जाण अपेक्षित होत. पण शस्त्रास्त्र आणि पैसे दोन्ही गोष्टी अफगाणिस्तानला किती गेल्या आणि मधल्या मध्ये पाकिस्तानन किती गायब केल्या याचा हिशोब ना अमेरिकेकड होता ना सौदी कड. यातला प्रचंड पैसा हा पाकिस्तानन त्यांच्या आण्विक बॉम्ब बनवायच्या कमी वापरला. मुशर्रफ प्रमाणेच लष्करी शासक असणाऱ्या जनरल झिया यांना हा “इस्लामिक बॉम्ब” बनवायचा होता. म्हणजे तो कोणत्याही इस्लामी राष्ट्राच्या रक्षणासाठी वापरता यावा असा. यातून पाकिस्तानन पाकिस्तानन हे तंत्रज्ञान इतर इस्लामिक राष्ट्रांना विकायचा प्रयत्न देखील केला. ज्यातुन एक मोठ गुंतागूंतीच जाळ विणल​. आणि जेव्हा हा व्यापार उघडकीस आला तेव्हा पाकिस्तानन खान यांचा बळी देऊन देशाचा आण्विक प्रकल्प सुरक्षित ठेवलाआणि काहीतरी थातुर मातुर कारवाई करून देशावर निर्बंध येऊ दिले नाहीत. ही निर्बंध घालायची अमेरिकेची तयारी होती का – तर नाही. अमेरिकेला देखील दिखाऊ कारवाई करायची होती. प्रत्यक्षात अफगाणिस्तानातील मोहिमेसाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या नाक-दुरया काढण भाग होत.

दुसरी या पुस्तकात सविस्तर दिलेली माहिती म्हणजे अमेरिकेन गुप्तहेर संस्था सी आय ए आणि अमेरिकन सरकारचे इतर विभाग यांच्यातील वेगवेगळ्या उद्दिष्टामुळ सी आय ए न माहिती देऊन सुद्धा सरकारन ती माहिती त्यांच्या कॉँग्रेस (संसद) पासून दडवून ठेवली. इतकंच नव्हे तर दोन वेळा खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी शपथेवर तद्दन खोटी माहिती अमेरिकन कॉँग्रेसला दिली. त्या त्या वेळच्या राजकीय स्वार्थासाठी अमेरिकन अधिकारी आणि राजकारणी यांनी पाकिस्तानच्या या कार्यक्रमाकड डोळेझाक केली. एवढंच नव्हे तर रिचर्ड बारलो नावाच्या एक सी आय ए अधिकाऱ्यान जेव्हा पाकिस्तानी निवृत्त सेनाधिकाऱ्याला रांगेहाथ पकडायचा प्रयत्न केला त्यावेळेला अमेरिकन सरकारच्या स्टेट डिपार्टमेंट मधील अधिकाऱ्यानी पाकिस्तानला त्याची पूर्वसूचना दिली आणि संबंधित लोक कचाट्यात सापडले नाहीत. कहर म्हणजे ही सगळी माहिती आणि पुरावे एकत्रित करणाऱ्या बारलो या अधिकाऱ्यालाच कारस्थान करून दूर केल, त्याच वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त केलं. या राजकारणात अमेरिकेतील काही सरकारी लोकानी सर्व धरबंद सोडून अगदी जागतिक आण्विक ऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख मोहम्मद अल बारदेई यांचा फोन देखील टॅप केला.

एकंदरीतच झुल्फीकार अली भुट्टो पासून ते मुशर्रफ पर्यन्त पाकिस्तानच्या वेगवेगळ्या सत्ताधीशांनी – केवळ हिंदू भारताशी बरोबरी करण्याच्या वेडापायी आधी बॉम्ब तयार केला आणि एकदा तो तयार झाल्यावर तो विकून पैसे कमवायचे मार्ग शोधले. हे सगळ चालू असताना अमेरिकेन सत्ताधीशांनी त्यांच्या इतर उद्दिष्टांपायी याकड डोळेझाक केली आणि जगासाठी भस्मासुर निर्माण केला.

लेखक द्वयीची ही मुलाखत देखील जरूर पहा. 

https://www.c-span.org/video/standalone/?201509-3/pakistani-nuclear-weapons

यावर आपले मत नोंदवा